साहित्य!
साहित्य वगैरे शब्दाला खरंतर खूप भारदस्तपणा येतो!
त्यामुळे माझ्यासारख्या छोट्याश्या लेखकाने स्वतःच्या लेखनाला साहित्य म्हणणं खरंतर हास्यास्पद वाटेल तुम्हाला, पण माझ्या हाताला ह्या "इंटरनेट" च्या माध्यमातून माझ्या छोट्याश्या लेखनाचा पसारा मांडायला एक "ब्लॉगस्वरूपी" साधन मिळालं. तेव्हा माझ्या या कथा / लेख / अथवा नाटकांना उगाच वाङ्मय किंवा ललित लेखन वगरे असे जाड शब्द वापरून जखडून ठेवण्यापेक्षा साहित्य म्हणलेलाच बरं! कारण पसारा हा फक्त साहित्याचाच होऊ शकतो,
वाङ्मयाचा एकतर ग्रंथ होतो, काव्य होते, नाहीतर आत्मचरित्र तरी!
मग निवडक, संग्रहातील किंवा साठवणीतील वगैरे शब्दांचा वापर होऊ लागतो!
एवढी काही माझी पातळी नाही, म्हणून हे साहित्य!
No comments
Post a Comment