"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday, 10 December 2016

नशीब

नशीब Photo courtesy : Google Images thumbnail 1 summary
नशीब

Photo courtesy : Google Images

माणसाची पण काय गम्मत आहे बघा,
किती सोईस्कर उत्तरं शोधली आहेत आपण स्वतःच्या समजुतीसाठी!
नसलेली गोष्ट प्राप्त करायसाठी घेतलेले कष्ट म्हणजे मेहनत...
त्यासाठी आलेले अपयश म्हणजे संधी...
अनेक वेळा आले तर जिद्द!
यातच जास्त काळ लोटला तर चिकाटी...
तरीही त्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे ध्येय!
आयुष्यभर ते तसेच राहिले तर तळमळ!
आणि तरीही प्राप्त न झाल्यास...
"
नशीब!"


-नितीश साने ©

No comments

Post a Comment