"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Thursday 15 December 2016

बेल

Photo courtesy : Google Images thumbnail 1 summary
Photo courtesy : Google Images
बेल


"आलो रे आलो"
पुन्हा एकदा समोरच्या घरातून ओ ऐकू आली, तशी पुस्तकातली नजर समोरच्या घराच्या दाराकडे वळली. आजही बाहेर कोणीच नव्हतं...
"
आलो रे हेमंता!" पुन्हा आवाज आला.
आतून काठीचा टक-टक असा आवाज येऊ लागला.

थोड्या वेळात हळुवारपणे समोरच्या अजोबांनी थरथरत्या हाताने दार उघडलं!
"काय वात्रट मूलं आहेत, बेल वजवून पळून जातात"
अशी स्वतःची समजूत काढून पुन्हा दार बंद झालं आणि काठीचा आवाजदेखील कमी कमी होत शांततेत विरुन गेला...

मला खूप अस्वस्थ वाटलं म्हणून मी बल्कनीतून उठून घरात आलो.
गेली अनेक वर्ष त्या घरातून खोकल्याचे, शिंकल्याचे, कहणल्याचे कधी हुंदक्यांचे, तर कधी कप बशी फुटल्याचे असे अनेक आवाज येत आहेत, पण हे सगळे आवाज सोसत आजही तो सामोरचा म्हातारा तग धरून आहे, फक्त त्या न वाजणाऱ्या बेलच्या अवाजापाई.
तिने एकदातरी वाजावं म्हणून तिच्याशी नित्याने संवाद साधतो आहे; पण "आलो रे" या अवाजामागे दार उघडण्याचा वेळ मात्र वाढत आहे,
प्रत्येक हाकेखातर...
आणि कदाचित वाढतच राहील, अगदी शेवटच्या हाकेपर्यन्त...


-नितीश साने ©


No comments

Post a Comment