बाविस बाय दहा
लिहावं तेव्हड थोडच आहे या विषयावर...
अतिशय चघळून झालेल्या या विषयावर लिहिण्याचे कारण असे की लेखक मंडळींचे लिखाण आणि या खेळात अतिशय साधर्म्य अढळून येते. मी काही
लेखक मंडळींमधे वगैरे मोडत नाही, पण थोड़े सुचले ते मंडावेसे वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न...
आमचं सुद्धा अगदी असच आहे, या क्रिकेट च्या खेळासारखं. आमचं काम हे बॉलिंग करायचं असतं. पण आमच्या बॉलला बॅट्स्मनकडून अथवा प्रेक्षकांकडून काय प्रतिसाद मिळतो, यावर आमची निवड ठरते.
ठरलेल्या त्या 22 बाय 10 च्या भाषेच्या चौकटी मधेच चेंडू टाकावे लागतात.
चुकून चेंडू बाहेर पडला तर अम्हालाही लोक वाइड चा हात दखावतात.
कधी नो म्हणून फुलीही मारतात.
पण खरी कला ते नियम समजून त्यात गोलंदाजी करण्यातच मानली जाते!
काही मझ्यासारख्यांना मात्र हे नियम मान्य नसतात, मग ते कुठल्यातरी गल्ली क्रिकेटच्या पीच वर खेळून सुधारणेला वाव शोधत राहतात!
इथेसुद्धा बॉलर ने बॉलची करायची निवड ही फलंदाजाच्या स्वभावावर अवलंबून असते.
कोणी थेट मधल्या स्टम्पकडे नजर ठेवून थेट आणि तूफान यॉर्कर गोलंदाजी करतात,
तर कुणी जोरदार गतिने येणारा चेंडू शेवटी अचानक पणे स्विंग करतात.
स्विंग इकडे पण दोन प्रकारचे असतात,
कुणी थेट इनस्विंग करत हृदयाला भिड़तात, तर कुणी सरळ येणारा चेंडू अचानक आउटस्विंग करुन तो खेळायचा का नाही ते बॅट्स्मनवर सोडून देतात.
कुणी मधेच एखादा बाउंसर टाकतात, तर काही जणांना फ़क्त बाउंसर चेंडू टाकायला आवडतात.
काही येऊन, स्पिन करुन जातात...
या स्पिन मधे पण परत दोन प्रकार असतात.
हे स्पिनवाले कधी जोरदार चेंडू टाकत नाहीत तर कधी उगाच रनउप पण घेत नाहीत...
हलकेच येऊन विनोदाने मनोरंजन करुन जातात. ऑफस्पिन वाल्यांचे विनोद वाखाणण्याजोगे असतात!
ते बाहेरून येऊन थेट मिड्ल स्टम्पमधे भिड़तात.
लेगस्पिन वाल्यांबद्दल मात्र फार न बोललेलेच बरे...
अहो बरेच बॉलर कधीतरी फुलटॉस विनोद करतात,
पण लेगस्पिन वाल्यांचे सर्वच विनोद ते भलतिकडूनच वळवतात...
काही सूंदर गूगली टकतात, तर काही वेगळ्या शैलीमुळे ओळखले जातात...
पण खेळाची मजा हि बॅट्स्मन तुमचा चेंडू कसा पारखतो यावर अवलंबून असते!
काही बॅट्स्मन ना यॉर्कर ची देखील चांगली जाण असते. हे यॉर्कर ला देखील पुढे येऊन षटकार खेचतात!
कुणी अगदी क्लीन बोल्ड सुद्धा होतात!
काही जण नुसते प्लेड करतात.
काही बाउंसर ला देखील कट मारतत, तर काहींना बाउंसर चेंडू समजला तरी ते रितसरपणे सोडून देऊन त्याकडे दुर्लक्ष करतात. काहींना मात्र हे उसळते चेंडू झेपतच नाहीत, ते उगाच या चेंडूंना सामोरे जायच्या नादात घायाळ वगैरे होतात आणि मग बॉलर वर टीका करतात.
खूप मोजके असतात जे स्वैरपणे फलंदाजी करतात, यांना सर्व प्रकारच्या चेंडूची जाण असते, इनस्विंग, आउटस्विंग, गूगली सर्वच चेंडूंवर तूफान फलंदाजी करतात!
पण बॉलर आणि बॅट्स्मन सोडून यात एक जाणकार प्रेक्षक वर्ग पण असतो!
ते एखादा सुंदर गूगली समजला नाही तर ऐक्शन रीप्ले सारखं गूगली ची ओळ पुन्हा पुन्हा वचतात आणि त्यातली मजा समजावून घेतात.
बाउंसर हे चेंडू म्हणजे यांच्या दृष्टीने फारशी गोलंदाजी न येता देखिल बचावाचं एक साधन असतं!
पण शेवटी हे एका परिपूर्ण ओव्हरला, ज्यामधे एखादा बाउंसर असतो, एखादा फुलटॉस असतो, कधी मुद्दामून पीच बाहेर टाकलेला वाइड असतो, आणि एखाद्या गूगलीने केलेला गूढ़ शेवट असतो, अश्या बॉलिंगलाच टाळ्या वजवतात!
या सगळ्यात गमतिचा भाग असा की खेळाचे नियम ठरावणारा अंपायर इथे पण लाखातला एकच असतो!
बाकी सर्व फ़क्त खेळाची मजा घेत असतात!
-नितीश साने ©
No comments
Post a Comment