"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Thursday, 15 December 2016

अवकाळी



अवकाळी

पूर्वी मी बरसायचो सगळीकडे,
नाद्या-नाल्यात, डोंगर-दऱ्यात, अगदी मनमुराद!
तुम्हीच दिलेल्या उपमांप्रमाणे, जणू चैतन्य पसरवत, संजीवनी देत!

हळू- हळू तुमच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या तसे बदल घडवत गेलो माझ्या येण्या- जाण्यात.
तुमच्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून कधी- कमी तर कधी जास्त!

तुम्हालाच अन्न-धान्याची कमी भासु नये
म्हणून चांगला कोसळायचो तुमच्या शेतात.

पण तुमचीच गरज वाढायला लागली म्हणून माझ्या नेहमीच्या वेळा सोडून आलो असाच एकदा अवकाळी!
मी चांगल्याच हेतुन आलो होतो खर तर, पण माझं असं अवकाळी येण तुम्हाला आवडलं नाही.
उलट तुमच्या पिकाचं नुकसानच झालं.

तुम्ही मला खुप शिव्या-शाप दिलेत म्हणून चिडून आलोच नाही एक-दोन खेपेला. तर तुमची मात्र पुरेवाट लागली तहानेपाई! तुम्ही भोलेनाथच्या विनावणी पासून पैशाच्या अमिषापर्यन्त सगळे प्रकार केलेत. शेवटी मलाच दया आली तुमची म्हणून आलो परत.

चांगला जोरदार कोसळलो माझ्या संपूर्ण शक्तिनिशि. तुमची धरणं भरली सगळी; पण नद्यांना पूर आले म्हणून तुम्ही मला परत नावं ठेवलीत. एवढं होऊन सुद्धा परत तुम्हाला पाणीसाठा पुरला नाहीच वर्षभर!

या वेळेस मात्र मला वैताग आलाय तुमच्या वागण्याचा. म्हणून वरुनच गम्मत बघत बसलोय खाली न येता.
आता तुमची धरणं सुकली की येऊन जाईन
एकदा थंडीमधे पुन्हा ती भरायला;
मधेच कधीतरी अवकाळी!


-नितीश साने ©

No comments

Post a Comment