अवली
नांदत होते सर्व सूखे तेव्हा कुणी अवली अवतरला,
विश्वाची रहस्ये उलगडण्याचा विडा त्याने उचलला!
दिसली अदभुत सृष्टी!
लावली सर्वत्र युक्ति!
चालू केली गणना चमत्कारांची,
तरी आजही संपली नाही गिनती!
कंटाळा आला या धरतीचा तेव्हा,
स्वारी निघाली अवकाशा!
चालू केले तेथेही संशोधन
तेव्हा कळले, हे ब्रह्मांड तर अंतहीन!
शोध लागले अपघाताने!
नंतर केली कारणमीमांसा!
स्वागत केले विश्वाने!
नंतर केली सत्वपरिक्षा!
ढासाळले संतुलन,
घसरले राहणीमान,
दिसले भयंकर परिणाम,
तरी, बदलले नाही जीवन
कोपली धरा,
घडविला विनाश
सोसल्या सहस्त्र कळा तेव्हा,
लागला संवर्धनाचा विरंगुळा!
दिसली सौरशक्ति!
गोळा केली विष्ठा!
बदलली पूर्व गणिते जेव्हा,
दिसली सर्वत्र ऊर्जा!
बदलले समीकरण,
केले निवारण,
जाहले बहुत जीवांचे संगोपन तेव्हा,
म्हणती कळू लागले पर्यावरण!
अर्थ
लावण्या या सगळ्याचा
सरली काही युगे!
तरी आजही म्हणती कुणी,
प्रायत्ने वाळुचे कण रगड़ता तेलहि गळे!
सरली काही युगे!
तरी आजही म्हणती कुणी,
प्रायत्ने वाळुचे कण रगड़ता तेलहि गळे!
-नितीश साने ©
No comments
Post a Comment