कुणीतरी असं म्हणून ठेवलय,
"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे"
पण हे काव्यात लिहिलं असल्यामुळे, काही जणांची बहुतेक अर्थात थोड़ी गफलत होत असावी, म्हणून
"ते जन्मात शतदा प्रेम करतात!"
आणि करतात म्हणजे सगळं अगदी जाहीर! लपून - छपून वगरे प्रेम करायचं या आता कालबाह्य पद्धती झाल्या.
आता जे करायच ते सगळ्या जगाला कळालं पाहिजे, ही पद्धत सद्ध्या ट्रेंडिंग आहे!
काही झालं की सगळ्यात आधी सगळीकडे स्टेटस उपडेट करायचे, फोटोज टाकायचे अशी सद्ध्या रीत असल्यामुळे, त्या फेसबुक आणि व्हाट्सएप नी देखिल आता, 'इन रिलेशनशिप विथ' वगैरे असे ऑप्शन्स चालू केले!
अहो, पूर्वी तरी लाइक वगरे अश्या गोष्टी लोक वापरायचे, पण आता एखादी गोष्ट आवडली की लगेच बदाम, मुका घेतानाचा तो स्माइली, काही झालं की लव यू!
एकंदर मला यातलं फ़ारसं काही कळत नसल्यामुळे, मला या पद्धती डोक्यावरुन जातात,
सकाळी उठलं, की आपल्या 'वॉल' वर रोज कोणाचे तरी प्यार मोहोब्बत, प्रेम असल्या गोष्टी घुसडून केलेले काव्यत्मक स्टेटस, ते स्माइली, सगळीकडे तेच...
चित्रपटात तेच, टीव्ही वर मालिकेतहि तेच...
एकंदरच काय, तर अख्ख्या जगात सध्ध्या, लोकांच्या प्रेमाला ऊत आलाय!
आमच्या सहित्याच्या ग्रुप वर काहीतरी वेगळं वाचायला मिळेल म्हणून गेलो, तरी प्रेम कविताच...
तिथून बाहेर येता येताच कोणाचेतरी मुका घेतानाचे फोटोज.
अहो म्हणजे माणसांचे नव्हे, वस्तुंचे मुके घेताना समस्त महिला वर्गाचे फोटोज. मग ही वस्तु टेडी बेयर पासून ते नवीन घेतलेल्या जेवणाच्या डब्यापर्यन्त कोणतीही असू शकते!
अशीच या मुके घेतनाच्या फ़ोटो वरुन आठवलं,
मागे एकदा आम्ही,
"ट्री प्लांटेशन केम्पेनला" गेलो होतो,
तेव्हाहि असच झाडं लावताना सेल्फ़ी काढणं चालू झालं. मग सेल्फ़ी काढून कंटाळा आल्यावर,
हे मुकासत्र चालू झालं!
त्यातलीच एक भगिनी, एकेक झाडाचा मुका घेत होती, मग तसा मुका घेतानाचा फ़ोटो आणि मग त्या झाडाची सुटका, म्हणजे लागवड होत होती...
वड झालं, पिंपळ झालं, चिंच झाली, जांभूळ झालं,
मग विपुल नावाच्या एका इसमाने पण प्रयत्न करुन पाहिला, पण त्याला मुक्या ऐवजी प्रसाद मिळाला...
बराच वेळ झाला, शेवटी मला त्या झाडांवरचे अत्याचार बघवेनात,
म्हणून मग मी म्हणालो,
ते लिपस्टिक जरा सांभाळून ठेवा मॅडम, नंतर आपल्याला "गार्बेज कैम्पेन" पण करायच आहे!
यचा मग व्हायचा तो परिणाम झाला,
पण निदान ते मुकासत्र तरी थांबलं!
बर एवढ्यावर भागलं नाही, दुसऱ्या दिवशी, फेसबुक वर, हे सगळे फ़ोटो परत पहावे लागले, सेल्फ़ी विथ वड, पिंपळ वगरे..
पुढच्या वेळेस मी दातपड़ीच झाडच् घेऊन जाणार आहे!
अहो, लोकं पण काय वाट्टेल ते जाहीर रित्या टाकतात.
आमच्या एका होतकरु वहिनीने, एका कुत्र्याच्या पिल्लाबरोबर फ़ोटो टाकला, तर ह्यानी,
लगेच, "काश मै तेरा कुत्ता होता...
खैर अगले जनम मे ही सही!" वगैरे फालतू पोस्ट बिनधास्त आपल्या घरच्यांसमोर टाकून दिल्या.
बर, हे एवढयावर थांबत नाही,
त्या दोघांच काय चाललय, यावर तिचा एक्स, नजर ठेऊन असतो!
ह्यांच बघून तो लगेच,
"हम को तेरे प्यार के जाल में फ़साना इतना आसान नहीं है पगली, क्यों की हम तुमसे पहले खुद से मोहोब्बत करते है!" वगरे सुरु...
इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे.
ह्या एक्स आणि गणिततल्या एक्सचं नातं जवळ जवळ सारखच आहे.
मुळात गणिताचा एक्स शी काहीही संबंध नसतो. एक्स ला पण गणिताबद्दल काही गंध नसतो...
पण तिसरा कोणीतरी या एक्सला काहीतरी मानतो, आणि त्याचं गणिताबरोबर सूत जुळवून देतो!
पण एकदा हा एक्स गणिताला चिकटला, की मग तो शेवटपर्यन्त गणिताची पाठ सोडत नाही...
अगदी तसंच ह्या एक्सच आहे!
पुढले काही दिवस, मग या तिघांचे स्टेटस, वधु पक्ष आणि वर पक्षाचे आई वडील आणि समस्त मित्र मंडळींची वॉल गाजवात राहिले...
लोकं पण ना प्रेमात पडली की काय वाट्टेल तसं वागतात.
आमच्या कॉलेजमधे, एक प्रेम म्हणून माझा मित्र आहे...
आजकाल हे नाव देखिल खूप कॉमन झालय.
तर या प्रेमला, एकदा मी एक सॅन्डल उलटा आणि एक सॅन्डल सुलटा घालून चालताना पाहिलं.
ही काय भानगड़ आहे बघुयात म्हणून मी थांबवून विचारलं,
"म्हणजे? तुला माहित नाही?"
"काय?"
"अरे अख्ख्या कॉलेज ला माहितीए.
मी परवा तिला स्टेटस मधून वचन दिलय,
हम जब चलेंगे तो हमारा एक जूता तुम्हारे दिल की ओर और एक जूता हमारे दिल की ओर निशाना करेगा"
मी हे ऐकून अवाक् झालो!
पण मग, इतक्यात कसं सोडायचं असं म्हणून मी अजून थोड़ी फिरकी घेऊयात म्हणून विचारलं,
" पण काय रे, ती समोरच्याच् बाजूला असेल कशावरून?
मागच्या दिशेला असली म्हणजे?"
"अरे काय तू पण,
ती मागच्या बाजूला असती तर मी तिकडेच नसतो का गेलो?"
या उत्तरानंतर, हातातली बाटली, त्याच्या डोक्यात घालावी, का स्वतःच्याच् डोक्यावर आपटुन घ्यावी, या संभ्रमात् मी पडलो असतानाच ती समोरून आली.
तिला तर याचं फारच कौतुक वाटत होतं! एकूणच काय, मी सोडून सगळ्या कॉलेजलाच हे फार भारी वाटत असल्यामुळे, मला सागळ्यांनीच वेड्यात काढलं होतं.
मग हळू हळू
"बदलाची सुरुवात स्वतःपासून होते" असे सूचक टोमणे मित्रमंडळींनी मारायला सुरुवात केलिच होती.
मग
म्हणलं, की करुन बघायला काय हरकत आहे? तेव्हड़ीच
जरा गम्मत!
म्हणून मग मी पण आज रात्री असाच एक 'तूफानी' स्टेटस टाकणार आहे!
बघुयात उद्या सकाळपर्यन्त त्यावर काय काय कमेंट्स येतायत ते!
म्हणून मग मी पण आज रात्री असाच एक 'तूफानी' स्टेटस टाकणार आहे!
बघुयात उद्या सकाळपर्यन्त त्यावर काय काय कमेंट्स येतायत ते!
-नितीश साने ©
Niteesh!..Khupch sundar lihilayas..adhipan vachlela tuza ha blog..n aaj loksattala alyavar parat vachtanahi tevdhch interesting vatala..keep writing sir..waiting for more blogs!
ReplyDelete