बदल्यात कामगिरी फक्त एवढीच आहे,
की एकदा तुझ्या भक्तांना दर्शन देऊन तर बघ!
त्यांच्यासाठी जगन्नाथ आणि सृष्टीचा
कर्ता तू आहेसच,
एकदा तुझ्याच सृष्टीतली थोडी जागा
व्यापून बघ!
बुद्धी आणि संपत्ती तर तू देतोसाच,
बदल्यात काहीतरी मागून तर बघ!
गणपतीत पाहुणा म्हणून खरच एकदा येउन
बघ,
आणि येशील तेव्हा,
१२ दिवसांचा मुक्काम आणखी थोडा
वाढवून तर बघ!
येताना वाहन म्हणून बरोबर, दोन मोठ्या घुशींना आणून बघ,
तुला फुलं, नारळ वाहतील रे ते,
पण त्या घुशींची पण पूजा-आरती करायला
लावून तर बघ!
एकदा खरच ते २२ मोदकाचं तुझ्यासाठी
ठेवलेलं ताट हाणून तर बघ,
विसर्जन पार्टीत कुठल्यातरी दादाला,
४ बाटल्या नुसत्या मागून तरी बघ,
गल्लीबोळाचा राजा म्हणतातच आता तुला,
एकदा राजासारखा अधिकार पण गाजवून बघ!
दानपेटीतली दक्षिणा घेऊन जा एकदा,
मग पुढच्या वर्षी लवकर या असं कोणी
म्हणतं का बघ!
गोमातेला डोक्यावर घेतलंच आहे,
एकेकाच्या घरात गाय सोडून बघ,
सॅनिटायझर वाल्यांची अंगणं, खरच गोमुत्र आणि शेणानी सारवून बघ!
मंदिरात रोज तुझा जप करणाऱ्या आणि
तुझ्या मूर्तीला दुधाचा अभिषेक
घालणाऱ्या, भटजीच्या घरी जाऊन,
रोज दुधाच्या अंघोळीचा हट्ट धरून तर
बघ,
सोन्याचे मुकुट आणि दागिने घालून
नुसतं, "चला येतो आता" म्हणून तर बघ!
दर सणाला येत जा, ठेवलेला नैवेद्य खरच फस्त करत जा,
गाभार्यात रोज हजेरी लावत जा,
पुजाऱ्याला रोज नवीन वस्त्र नेसवायला लावत जा,
लक्ष्मीपूजनाला एखाद्या सराफाने
मूर्तीपुढे ठेवलेली लक्ष्मी खरच एकदा घेऊन जा,
येशील तेव्हा तुझ्या रथाचं पार्किंग,
मंदिराच्या बाहेर करत जा.
एक वर्ष तरी यांना बुद्धी आणि
संपत्ती न देत सहजच येउन जा,
पण तुझ्या या भक्तांची क्रेझ कमी करायला
खरच एकदा येउन जा!
माझा काही तुझ्यावर विश्वास नाही,
पण माझा माझ्यावर विश्वास आहे.
कमावलचं, यातलं सारं, तरी गरजूंना देईन एकवेळेस, पण तुला यातलं काही देणार नाही.
कविकल्पनाच आहे ही, पण तू आलास जरी खरच तरी मला काही फरक पडणार नाही.
कारण नुसती लालूच दाखवून काम करून
घेणाऱ्यातला मी तरी नाही.
पण तरीही माझं हे कधीही साकार न
होणारं स्वप्न आहे,
की तू एकदा वरून खाली यावस!
खाली खूप गम्मत आहे रे...
करमणूक होईल खूप तुझी...
आणि माझीही!
-नितीश साने ©
No comments
Post a Comment