"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday 20 May 2017

तो हल्ली गप्प गप्पच असतो...

तो हल्ली गप्प गप्पच असतो... thumbnail 1 summary
तो हल्ली गप्प गप्पच असतो...




तो हल्ली गप्प गप्पच असतो...
एकदा का घराबाहेर पडला की सायलेंट वरच असतो...
चुकून वाजलाच बाहेर एखाद दिवशी तरी आस पास लगेच कुजबूज होते...
फक्त त्याचीच नाही, अजुबाजूच्या सगळ्यांची हीच गत असते...
सतत कोणाच्यातरी "खिशात" राहिल्याचा परिणाम असावा बहुतेक...
कितीही राग आला तरी तो आतून फ़क्त खड़खदत राहतो...
थोडा व्हायब्रेट होतो, पण तरीही त्याची बोलायची हिम्मत मात्र होत नाही!
फक्त घरी आला की तो "मनमुराद" वाजत असतो!
त्यामुळे त्याच्यातला आणि माझ्यातला फरक देखिल कमी होऊ लागला आहे हळू हळू...
- तुमच्या खिशातला,
   तुमचा,
   मोबाईल!


-नितीश साने ©

No comments

Post a Comment