"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Saturday 20 May 2017

कळत नकळत...

कळत नकळत... thumbnail 1 summary
कळत नकळत...




कळत नकळत काळाच्या ओघात कधीकधी आपण इतक्या जुन्या गोष्टी स्वीकारून जातो की नंतर आपलं अपल्यालाच समजत नाही की काय चूक आणि काय बरोबर...
लहान पणापासून शाळेत जायच्या वेळेस रडणाऱ्या मुलाला शिक्षण हळू हळू इतकं लाचार करुन जातं,
की एक दिवस त्यातून सुट्टी मिळाली, तर काय कारावं हेदेखिल त्याला सुचत नाही...
लहान मूल तरी किमान नुसतं बागडून येतं,
पण एकदा नोकरी करायला लागलं, की तेदेखिल चुकीचं वाटू लागतं...
शिक्षणाचेच दुष्परिणाम...
दर वर्षी येणाऱ्या परिक्षांचं, इतकं दडपण मनावर बिंबवलं जातं, की तेच ध्येय ठेऊन, त्या तासांच्या पेपर साठी अख्ख वर्ष जगलं जातं ; त्या परिक्षेलाच आयुष्याचं ध्येय बनवून!
म्हणूनच एकदा का शिक्षण संपलं की पुढे काय करावं हे कळत नाही, कारण आयुष्याच ध्येयच तिथे संपलेलं असतं!
अनेक हुशार मूलं परीक्षेत पहिली येऊन देखील, जीवनाच्या शर्यतीत फारसं काही करू शकत नाहीत त्याच हेच कारण असावं...
बँकेबद्दल पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुमच्या परवानगी शिवाय तुमचे पैसे दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीला वापरायला देऊन त्यावर अधिक पटीने व्याज वसूल करणारी ही बँक, मनात कुठेतरी तुमची होणारी फसवणूक वाटत असते...
पण हळू हळू हीच जगाची रीत आहे हे स्वीकारले जाते आणि आपला स्वकमाईचा प्रत्येक पगार आपण अगदी हसत हसत बँकेत जमा करतो!
हळू हळू तब्येत साथ देईनाशी होते, तशी डॉक्टरकड़े होणाऱ्या खेपांची संख्या वाढत जाते. डॉक्टर तुमच्याशी गोड बोलतो, तुम्हाला बरं देखील करतो! जाताना तुम्ही त्याच्याच हातावर नोट टिकवून त्यालाच "थैंक यू" म्हणून जाता,
पण तुमचं व्यवहार ज्ञान तुम्हाला हे कधीच सांगत नाही की तुमच्या अजारपणामुळे सर्वात आधी खुश होणारा माणूस म्हणजे तुमच्या समोर बसलेला डॉक्टर असतो, आणि तुम्ही बरे होऊन जताना देखील, तुम्ही पुन्हा अजारी पडण्याचा विचार देखील तोच करत असतो!
हळू हळू वय होतं, तशी जगानी केलेली ही फसवणूक तुमच्या लक्षात येते,
पण तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही कारण तोपर्यन्त तुम्हाला या जगाने भरपूर लाचार बनवलेलं असतं,
तुमच्या कळत नकळत...



-नितीश साने ©

No comments

Post a Comment