"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Tuesday 25 July 2017

जंजिरा (janjira fort)

जंजिरा (janjira fort) पुण्यापासूनचे अंतर: (१६२ किलोमीटर) पोहोचण्यास लागणारा कालावधी: सुमारे ४ तास जवळचे बंदर: दिघी / राजपुरी बघण... thumbnail 1 summary
जंजिरा (janjira fort)

पुण्यापासूनचे अंतर: (१६२ किलोमीटर)
पोहोचण्यास लागणारा कालावधी: सुमारे ४ तास
जवळचे बंदर: दिघी / राजपुरी
बघण्यासाठी असलेला मर्यादित वेळ: ४५ मिनिटे
लागणारे दिवस: १ दिवसात शक्य








जंजिरा! गेली काही शतके अरबी समुद्रातील एका बेटावर इतिहासाची साक्ष देणारा हा बुलंद किल्ला!
सागरी किल्ल्यांचा जणू सम्राटच! सागरी किल्ला जर का भटकंतीचा पर्याय म्हणून निवडायचा असेल तर जंजिरा आणि सिंधुदुर्ग कोणाच्याही यादीत पहिल्या काही स्थानात येतील यात शंकाच नाही! त्याला कारणही अगदी तसच आहे. 



जंजिरा किल्ला हा मुळातच अतिशय सुंदर आहे! भक्कम बांधकाम, आजही टिकून राहिलेले बांधकामाचे सुंदर अवशेष, आजू बाजूला अथांग पसरलेला समुद्र! समुद्रात दूर दूर वर दिसणाऱ्या शिडाच्या होड्या, लांब जमिनीवर दिसणारी कोकणातील आकर्षक गावं, होडीतून केलेला प्रवास... हे सगळंच खूप देखणं आहे!



पुण्याहून निघून खरं तर एका दिवसात हा किल्ला करून परत येणं हे तसं प्रवास न आवडणाऱ्यांसाठी कंटाळवाणं काम आहे पण तुम्ही; 
"अरे रविवारी दुपारी टीव्ही बघत बसलो होतो, एकदम समुद्राचं दृश्य आलं, म्हणलं चला जाऊयात समुद्रावर! १२ वाजले होते, आणि नेमकी बाईक नव्हती, मग काय ऍक्टिव्हा काढली आणि निघालो. ४ वाजता समुद्रावर! ४ ते ६ समुद्रात खेळलो, ६ ला निघालो १० ला पुन्हा पुण्यात!
दुसऱ्या दिवशी ऑफिस!"
अश्या प्रजातीत मोडणारे भटके असाल तर जंजिऱ्याबरोबर तुम्ही अलिबाग येथील कुलाब्याचा किल्ला सुद्धा एका दिवसात करून याल!

कसे जाल?

जंजिऱ्याला जायसाठी राजपुरी (मुरुड पासून ४-५ किलोमीटर दूर) आणि दिघी (दिवेआगर पासून साधारण २० किलोमीटर दूर) असे प्रामुख्याने पर्याय आहेत! जंजिऱ्याला जाण्याकरिता प्रथम येथे मोटरबोट मधून आणि मग तिथून किल्ल्याच्या जवळ आल्यावर पाण्यातच बोट बदलून शिडाच्या होडीतून पुढे जावे लागते! (सुरक्षेच्या बाबतीत खूप दाखल घेतली जात नाही.)

काय पाहाल?

खरं तर संपूर्ण जंजिरा तुम्हाला डोळे भरून पाहायचा असेल तर एक दिवस पण कमी पडतो! पण बोटचालकांनी मर्यादित वेळेची राऊंड ठेवल्यामुळे तुम्हाला ४५ मिनिटात परत यावे लागते. 



तेव्हा गाईड घेऊन बनावट कहाण्या ऐकत वेळ दवडण्यापेक्षा किल्ल्याला एक झटपट फेरफटका नक्की मारून या आणि हे नक्की पहा!
१) किल्ल्यावरील कलाल बांगडी हि लांब पल्ल्याची तोफ



२) सुरुलखानाचा भव्य महाल



३) किल्ल्यावरील मशीद



४) पाण्याचे तलाव

तेव्हा एखाद्या रविवारी थोडासा प्रवास करून जंजिऱ्याला भेट देऊन येणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो! 


-नितीश साने ©

No comments

Post a Comment